राज्यातील सर्व गट संसांधन केंद्रातील तालुकास्तरावरील कंत्राटी सर्व कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ची कामे होणार ठप्प*

Saoner

राज्यातील सर्व गट संसांधन केंद्रातील तालुकास्तरावरील कंत्राटी सर्व कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ची कामे होणार ठप्प*

राज्यातील सर्व गट संसांधन केंद्रातील तालुकास्तरावरील कंत्राटी सर्व कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार जल जीवन मिशन वस्वच्छ भारत मि शन ची कामे होणार ठप्प*                                                                                  BPS LIVE NEWS NETWORK                                         नागपूर:- दि.- 13 राज्यातील सर्व पंचायत समिती मध्ये पाणी व स्वच्छता विभागाच्या गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह् समन्वयक हे कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि.14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार असून यामुळे राज्यातील जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत अभियान ग्रा. या दोन केंद्र शासन व राज्य शासनाच्या अतिशय मह्त्वाचे योजनाचे काम् मार्च महिन्यातच ठप्प होणार आहे.अशी माहिती गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता विभाग कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास निकम यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की केद्र शासन पुरस्कृत सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम ,जलजीवन मिशन व् स्वच्छ भारत अभियान ग्रा. या विभागातील गेल्या दहा ते बारा वर्षा पासून सर्व जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील या योजनाचे काम पाहणारे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.या सर्व कर्मचारी नी केलेल्या कामा मुळे महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाकडून स्वच्छता विभागाला विविध पुरस्कारानी गौरविण्यात आले परंतु हे अहोरात्र काम करणारे कर्मचारी यांना शासना कडून एकदाही मानधन वाढ दिलेली नाही. तसेच आज रोजी पन्नास टक्के रिक्त पदे असताना देखील पद भरती केलेली नाही . तरी देखील कमी संख्या असून देखील या विभागाचे काम देशात चांगले होत आहे . महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षात आपली उत्कृष्ट सेवा दिलेली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेची चळवळ गावोगाव् राबवणारे याच शिलेदारांनी आयुष्याची उमेदीची वय घालवली, जीवाचे रान केले व गावापासून ते राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी अहोरात्र सेवा दिलेली आहे. कोरोना परिस्थितीत गावस्तरावर अनेक स्वच्छता विषयक जनजागृती चे काम त्यांच्या माध्यमातुन झाले आहे. देशाला हागणदारीमुक्त करण्याचे दृष्टीने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम स्थानी असलेल्या विभाग आहे. या माध्यमातून देश व महाराष्ट्र हागणदारीमुक्त झालेला आहे. पाणी व स्वच्छतेच्या बहुमूल्य कामामुळे महाराष्ट्र राज्याने अनेक वर्ष प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अनेकदा राज्याला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. तर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणी व स्वच्छतेच्या कामामुळे पदोन्नती मिळालेल्या आहेत.वरील सर्व बाबींचा विचार केला असता देखील इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांपेक्षा अल्प मानधनावर तालुका स्तरीय कर्मचारी काम करत आहे. यामुळे शासनाने ज्या योजनावर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना या योजनेचे काम बघणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण सुरु आहे या मानसिकतेतून कर्मचारी नी दि. 14 मार्च रोजी राज्यभरातून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत . ~~~शासनाकडे केलेल्या मागण्या ~~~ * मानधनात् वाढ करून मिळावी * वैद्यकीय प्रसूती रजा व खर्च मिळावा व विमा कवच लागू करावे * सध्या स्थगित केलेली मानधन वाढ मिळावी * रिक्त असलेली पदे भरावी अशा मागण्या निवेदनात केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षात शासनाने तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारीना एकदाही मानधन वाढ केलेली नाही. यावेळी मानधन वाढ घेतल्याशिवाय राज्यव्यापी संप मागे होणार नाही.तरी शासनाने दखल घ्यावी.